Posts

Showing posts from October, 2025

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है..

एक महेंद्र आहे, आणि एक माया. महेंद्रच्या नावात फार काही विशेष नाही, पण माया म्हणजे ‘माया’च! मायेत एकदा गुरफटलं की काही खरं उरत नाही. भोवतालातलं सगळं जग विलक्षण मोहमयी होऊन जातं. त्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर जीव जडून बसतो, आणि तो तिथून निघता निघत नाही. असा जोरकस दिललगाव असा जीव जीवात रुतून बसलेला काही काळ सरतो आणि मग एखादं वळण असं येतं, महेंद्रला मायेपासून वेगळं व्हावं लागतं. वेगळं म्हणजे लौकिकार्थाने वेगळं. जगरहाटीमुळे वेगळं. माया एवढी मनस्वी असते कि तिला कायम चिमटीत पकडून ठेवणं महेंद्रला अशक्य असतं आणि तिला सोडून देणंही. म्हणजे तिच्यापासून दूर गेला तरीही त्याला तिच्यापासून दूर जाता येत नाही. आणि माया एवढी मनस्वी आहे की महेंद्रला सोडून गेली तरी महेंद्रला ‘सोडणं’ तिला शक्य होत नाही. तरीही, महेंद्र आता तिचा उरलेला नाही, त्याच्या आयुष्यात एक ‘सुधा’ आलेली आहे. महेंद्र आणि मायाने एकमेकांना स्पर्श करण्याच्या दरम्यान एक अदृश्य काचेरी भिंत निर्माण झालीये, ज्याच्यातून ते दोघेही एकमेकांच्या देहा-आत्म्याला सतत दिसत, भासत, जाणवत राहतात, पण त्यांना एकमेकांना स्पर्श नाही करता येत. तगमग तगम...