Posts

Showing posts from September, 2022

बोलबच्चन ते अबोलबच्चन

शाहरुख खानची एक मुलाखत पाहत होतो. त्यात तो म्हणाला, मुझे कभी भी नही लगा था की मै स्टार बन जाउंगा. मुझे लगता था की मेरी सूरत हीरो जैसी नही है. लेकीन मै खुशकिस्मत था के जब मै फिल्मो मे आया तो जमाना बदल रहा था और बदलते जमाने की मांग शाहरुख खान थी. ‘देखणा चेहरा’ हेच एकेकाळी चित्रपटात हीरोगिरी करण्यासाठीचं महत्वाचं भांडवल मानलं जाई. शाहरुखकडे ते नव्हतं. तरीही तो मागच्या पंचवीस वर्षांतला सर्वात मोठा यशस्वी स्टार झाला. हे स्टारपद त्याला मिळण्यामागचं महत्वाचं कारण होतं – बदलत असलेला काळ. ‘शक्तीमान नेता आणि सुपरस्टार अभिनेता हे काळाचं अपत्य असतं’ असं एक सर्वमान्य विधान आहे. प्रत्येक बदलत्या काळाचं स्वत:चं असं एक ‘स्टेटमेंट’ असतं. हे ‘स्टेटमेंट’ ज्यांना सशक्तपणे करता येतं, ती माणसे पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नरेंद्र मोदी किंवा अमिताभ बच्चन होतात. हिंदी चित्रपटाच्या क्षेत्रात असं ‘सोशिओ-पोलिटिकल स्टेटमेंट’ सर्वाधिक प्रभावीपणे करून दाखवणारं कदाचित एकच नाव असू शकेल - अमिताभ बच्चन! शहेनशहा. स्टार ऑफ द मिलेनिअम. जगातलं कुठलंही ‘सुपरलेटिव्ह’ बिरूद आणा. अमिताभ बच्चनला ते सार्थपणेच शोभून दिसतं.     हिं