Posts

Showing posts from September, 2015

या रिकामपणाचं करायचं काय ?

“ काय मग बंटीशेठ, लागल्या सुट्ट्या ? ” “ लागल्या की ! ” “ मग आता काय मामाच्या गावाला जाणार ? ” “ मामाच्या गावाला ? हे हे हे.. “ बंटी खळखळून हसला. “ लहानंय काय मी आता, सुट्ट्या लागल्या की मामाच्या गावाला जायला ? ” “ मग काय प्लान सुट्टीचे ? ” “ प्लान कसले करणार ? सकाळ संध्याकाळ इथंच गावात इकडं तिकडं करायचं, दुपारी शेतात जायचं.. ” “ शेतातली कामं करतोस तू ? ” “ न करून सांगतोय कुणाला ? दादाच्या किरकिरीपेक्षा शेतात जाणं परवडतं.. काम असू, नसू.. ” “ किरकिर करतात दादा ? का ? ” “ ’ गावात बोंबलत हिंडू नकोस’ म्हणतात.. ” “ गावाला हिंडायचंच कशाला पण ? काही वाचन लेखन करावं, काही खेळावं .. ” “ काय वाचणार इथं आपल्या गावात ? रोजच्या पेपराशिवाय आहे काय इथे वाचायला ? ” “ तेही खरंच ! बाकीची मुलं काय करतात मग गावातली आपल्या, अशा सुट्ट्याबिट्ट्यांच्या दिवसात? ” “ तुम्ही करायचा तेच ! ” बंटी पुन्हा हसला. बंटीचं उत्तर ऐकून मी बराचसा ओशाळलो. कॉलेज चालू असताना सुट्ट्यांची परोपरीने वाट बघणारे आम्ही, प्रत्यक्षात सुट्ट्या लागल्यावर चार-दोन दिवसांतच वै