Posts

Showing posts from 2016

सैराटच्या निमित्ताने : बेबंद

निसर्ग आधी असतो की जात-धर्म आधी असतात ? जीवशास्त्र आधी असतं की लोकांच्या टोळ्यांनी एकत्र येऊन लिहिलेलं सोयीचं स ‘ माज ’ शास्त्र आधी असतं ? शाश्वत काय असतं नि लादलेलं काय असतं ? मातीतून रक्तात आलेलं अधिक खरं असतं की या-त्या सत्तेच्या माजातून उद्भवतं , ते खरं असतं ? यांच्यात संघर्ष उभा होतो तेव्हा जिंकण्याचा हक्क कुणाला असतो मग ?  ‘ सैराट ’ नावाच्या सिनेमानं हे प्रश्न मनात आणलेच. सैराटचं जेवढं प्रचंड कौतुक झालं तेवढीच प्रचंड विखारी टीकाही सैराटने सोसली आहे. या-त्या जातीचे लोक आमनेसामने आले , विशेषत: समाजमाध्यमातून ही तेढ अधिक मोठय़ा प्रमाणात उफाळून येताना दिसली. जाती-अंताच्या वाटेवरून हयातभर चालत आलेल्या महापुरुषांची नावे घेत घेत आपण तीच व्यवस्था मजबूत करण्याकडे चाललेलो आहोत , याचं अजिबात भान लोकांना उरलेलं दिसलं नाही. अगदी चित्रपटात दाखवलेल्या नायिकेच्या चित्रपटातल्याच जातीपासून , ती भूमिका करणार्‍या मुलीच्या वास्तवातल्या जातीची चर्चा करण्यार्पयत सोशल साइट्सवर वावरणार्‍या कथित सुज्ञ सुशिक्षितांनी पातळी सोडलेली दिसली.   सैराटमध्ये असं वेगळं काय आहे की त्यानं एवढ