Posts

Showing posts from March, 2016

जो जे वाट्टेल तो ते बोलो..

काळ गोंधळाचा आहे. ‘जनतेपैकी’ लोकांसाठी तर फारच गोंधळाचा आहे, मंडळी बोलायला लागली आहेत. अमाप आणि आडमाप बोलायला लागली आहेत. मंडळींना उमगत नाही, उकलत नाही असा एकही विषय नाही. एसटीच्या फाट्यापासून चार किलोमीटर आत अजूनही चालत जावं लागतं अशा ‘येड्याच्या वडगावा’तला कुणी बुद्रुक इसम शिवारात म्हशी राखता राखता अँड्रॉइड फोनवरून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर छातीठोक बोलताना दिसतो तेव्हा गंमत वाटते. चौथीच्या इतिहासात वाचलेल्यापैकी आजवर स्मरणात उरलेलं ‘शिवाजी महाराज नावाचा एक पराक्रमी राजा महाराष्ट्रात होऊन गेला’ हे एकच वाक्य माहित असलेला भिडू इतरांचं ऐकून ऐकून ‘अमुक तमुकाने इतिहासाचे विकृतीकरण केलं’ हे वाक्य उच्चारू लागला की इतिहासाच्याऐवजी भविष्याबद्दलच चिंता वाटायला लागते. स्वत:च्या म्हाता-या आईबापांकडे नीट न बघणारी माणसे, वृद्धाश्रमात सुन्नपणे बसलेल्या वृद्धांच्या व्हायरल झालेल्या फोटोखाली भावनाकुल कॉमेंट्स लिहिताना दिसली की चालू युगात ठासून भरलेल्या अद्भुत कोडगेपणाचा नव्याने साक्षात्कार व्हायला लागतो. स्वत:च्या गावातल्या ग्रामपंचायतीचा कारभार किती रामभरोसे चालू आहे हेही नीट माहित